अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यांवर एकनाथ खडसेंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलं होतं. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर त्यांच्या फार तिखट प्रतिक्रिया येतात त्यामुळे न बोललेच बरं असं खडसे म्हणाले. खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे माध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्तीच्या 12 आमदारांच्या प्रलंबित विषयावरून देखील त्यांनी भाष्य केलं. राज्यपालांना राज्य सरकारला मार्गदर्शन करताना वेळ का लागतो..? ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे अशा राज्यात अशा अडचणी का निर्माण होत नाही. निलंबित 12 आमदारांचा प्रश्न भाजपने जसा लावून धरला तसा विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्तीच्या 12 आमदारांचा विषय का लावून धरला नाही. त्या बारा आमदारांच्या यादीत माझं देखील नाव आहे असं मला बाहेरून कळले आहे.एक एक वर्षे निर्णय न देणं हा राज्यपालांकडून होणारा अन्याय असल्याचे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्याबाबत भाष्य करत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. “तुम्ही हे विसरुन जा की मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा मी सामान्य स्त्री म्हणून बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा इतर गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. आज मुंबईतील खड्ड्यांमुळे ट्राफिक जाम होतं आणि या ट्राफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, असा दावा त्यांनी केला होता.
हे देखील वाचा :
- करिअरमध्ये यश मिळेल, जबाबदाऱ्या वाढणार ; शनिवारचा दिवस कसा जाईल तुमच्या राशीसाठी?
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली