जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पॅनलचा पराभव झाला, तर गुलाबराव पाटील आणि गिरीश महाज यांच्या गटाने बाजी मारली. खडसे यांच्या पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले आ. चव्हाण?
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी मला अनेक राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. खडसे यांचा पराभव करा असं मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता म्हटलं आहे.
दरम्यान ईडी कारवाईवरून देखील मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्यास ईडी मागे लागते. ज्यांच्या मागे ईडी लागली त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे, असं मगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. आता मंगश चव्हाण यांच्या टीकेला एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.