⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | गिरीशभाऊ दारू पीत नाही, बिडीही पीत नाही, पण त्यांना एकच सवय..; नाथाभाऊंचा घणाघाती हल्ला

गिरीशभाऊ दारू पीत नाही, बिडीही पीत नाही, पण त्यांना एकच सवय..; नाथाभाऊंचा घणाघाती हल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत मला पाडायचा असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा…असं चॅलेंज दिलं आहे. आता अशातच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.

गिरीश महाजन हा माणूस नुसतं बडबड करणं आणि खोटं करणं देवेंद्रजींच्या छत्रछाया खाली राहुन मोठा झालेला गिरीश महाजन माणूस आहे. स्वतःचं कर्तृत्व गिरीश महाजनांचे शून्य आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना भाव देण्यासारखं महत्त्व नाही, असं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंना बदनाम करण्यासाठी अक्सापोटी माझ्याविषयी षडयंत्र रचल्या गेलो होतं. त्याचा प्रमुख सूत्रधार कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. गिरीश महाजन यांनी एका माध्यमाशी बोलताना दिशाभूल करत माझ्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणतात भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचं नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री असताना तेवढी अक्कल मला होती. गिरीश महाजनांनी भूखंडासंदर्भात माहिती दिलेली आहे ती अत्यंत चुकीची दिली आहे.

खडसे म्हणाले, मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं…एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या सवयीवर चर्चा रंगली आहे.

आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी तुमच्या आमदाराची आहे. काय करतोय तुमचा काय करतो आमदार? असा प्रश्न उपस्थित करणात आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी घेरले. तुमच्या आमदारानेच बोदवडमध्ये पाणी दिले नाही. ते म्हणतात, कोथळी ग्रामपंचायतीचा सरपंच तुमचा नाही. तर घ्या त्या सरपंचाची प्रतिक्रिया अन् विचारा त्यांना कुणाचा सरपंच आहे, असे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.