⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

..ते बालिश आहेत ; गिरीश महाजनांच्या ‘त्या’ टीकेवर खडसेंचं प्रत्त्युत्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झालीय, असा निशाणा भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार एकनाथराव खडसेंवर (Eknath khadse) साधला होता. दरम्यान, आता या टीकेला खडसे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत खडसेंना विचारल्यावर त्यांनी गिरीश महाजन बालिश आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे. Eknath Khadse criticizes Girish Mahajan

आमदार एकनाथ खडसे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यावेळी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं. पहिल्यांदा त्यांना मीच आमदार म्हणून निवडून आणलं. ते बालिश आहेत.” एकनाथ खडसे पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित केली.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?
गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका करता म्हणाले होते की, पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी अस ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे”, .“खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले.

पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधान परिषदे शपथ घेतली. त्यांना माझ्या शुभेच्छा, असं महाजन म्हणाले होते.