⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर एकनाथ खडसे संतापले, म्हणाले..

सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर एकनाथ खडसे संतापले, म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील संतापले आहेत.

नेमकं काय म्हणाले खडसे?
“अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी विरोध करतो. हा संस्कराचा परिणाम आहे. आई-वडिलांनी ज्याला शिकवले नाही तो अशा रीतीने बोलू शकतो”, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.“एका महिलेचा केलेला हा अपमान संतापजनक आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आपले शब्द मागे घेतले पाहिजेत”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले..
“इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.