⁠ 
बुधवार, मे 1, 2024

..म्हणून गिरीश महाजनांची वैद्यकीय शिक्षण खात्यातून हकालपट्टी झाली ; खडसेंचा प्रतिहल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा होता. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. एकनाथ खडसेंवर यांच्यावर 137 कोटी रुपयांची नोटीस आल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्‍याचे सोंग केला. त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला? असा आरोप गिरीश महाजन यांनी केली होती. आता मंत्री महाजनांच्या आरोपांवर एकनाथ खडसेंनी प्रतिहल्ला केला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना गिरीश महाजन यांनी प्रसुतीशास्त्र विभागात जास्त लक्ष दिले. त्यामुळे त्यांची त्या खात्यातून हकालपट्टी झाली, अशा शब्दात आमदार एकनाथ खडसे यांनी महाजनांच्या आरोपांवर प्रतिहल्ला केला.गिरीश महाजन ६० वर्षांचे होत आलेले असल्यामुळे त्यांना काही सूचत नाही. त्यांना खात्री करायची असेल तर माझे सर्व कागदपत्रे तपासावेत असेही आव्हान दिले.

कार्डियाक अॅरेस्ट हा काय प्रकार असतो तो पाहून घ्यावा. आजार खरा की खोटा हे तपासावे. त्यांना खडसे नावाची कावीळ झाली आहे. कापूस उत्पादक अडचणीत आहेत. त्यांना महाजनांनी न्याय मिळवून द्यावा. जरांगे पाटील यांची भेट घेऊन चमकोपणा करायचा, स्वत:ला संकटमोचक म्हणून घ्यायचे, हे वागणे बरे नव्हे. तुमचे उद्योग हळूहळू बाहेर येतील. खडसे यमुनेच्या तिरावर बसून हवेत गोळीबार करणारे नाहीत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने गुरुवारी आकाशवाणी चौकात मंत्री महाजनांच्या प्रतिमेवर शाईफेक करत निषेध केला.