⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान ; म्हणाले..

लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी देखील सुरु आहे. दरम्यान, जळगावातील सभेमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. अशातच आता लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत एकनाथ खडसेंच (Eknath Khadse) सकारात्मक विधान केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निडवणुकीत सून विरुद्ध सासरे अशी लढत होऊ शकते.

काँग्रेस 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सुमारे 10 निवडणुकांनंतर काँग्रेस ही जागा लढवत आहे. तेरा महिन्यांत एक निवडणूक वगळली तर काँग्रेसला येथे यश मिळालं नसतं, असे कार्यकर्त्यांचं मत आहे. काँग्रेसनं ही जागा 9 वेळा गमावली असती. ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन येथे आपला उमेदवार उभा करू.”, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तसेच, अखेर इंडिया आघाडीनं घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार असून जर एकनाथ खडसेंना पक्षाने उमेदवारी दिली तर सून विरुद्ध सासरे अशी लढत लढताना दिसून येऊ शकते. मात्र, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रावेर लोकसभा निवडणूक काँग्रेसचं लढविणार असल्याचं म्हटलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.