जळगाव शहर

एकलव्य क्रीडा प्रशिक्षण शिबिर उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ ।  एकलव्य क्रीडा संकुल येथे १५ एप्रिलते १५ मे  २०२२ दरम्यान  घेण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप दिनांक १८ मे २०२२ रोजी सायंकाळी मू. जे. महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगांव महानगर पालिका,  मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी ,   ब्रूस एन्डरसन, मुख्याध्यापक ओरीओन स्टेट बोर्ड स्कूल, जळगांव, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (क्रीडा संचालक मू. जे. महाविद्यालय व प्रशासकीय अधिकारी एकलव्य क्रीडा संकुल) व प्रा. रणजित पाटील (शिबीर प्रमुख) तसेच पालक प्रतिनिधी म्हणून एस.आर. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश जोशी यांनी केले, तसेच शिबिराचा अहवाल प्रा. रणजित पाटील यांनी वाचून दाखवला व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. प्रविण कोल्हे यांनी केले.

सदर क्रीडा प्रशिक्षण शिबिरात एकूण ४६५ सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगांव महानगर पालिका, जळगांव,  मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांनी खेळाडू व पालकांना जीवनातील खेळाचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन केले तर डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी एकलव्य स्पोर्ट्स अॅकॅडमीची भविष्यातील वाटचाल यासंबंधी माहिती दिली.

या वेळी सामान्य शिबिरातील उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव डॉ. विद्या गायकवाड, मिलिंद दीक्षित, यांच्या हस्ते करण्यात आला.  कु. अर्णव राजकुळे, कु. श्रावणी देशपांडे, कु. रक्षित देशमुख व कु. दिव्यंका पाटील शिबिरातील उत्कृष्ट खेळाडू ठरले. बक्षीस वितरण समारंभानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स सदर केले. या शिबिरात खेळनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी कु. अद्विता अमित चोपडे, कृष्णा सागर झांबरे, कु. निष्ठा नितीन थोरात व कु. अमय सोनवणे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील त्यांचे अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले. याच बरोबर संदीप पाटील, घनश्याम धर्माधिकारी, सौ. सोनवणे या पालकांनीसुद्धा याप्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एकलव्य क्रीडा संकुलाच्या कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Related Articles

Back to top button