जळगाव लाईव्ह न्यूज । सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन गडावरून घरी परताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर वीट भट्टीजवळ इको व आयशर वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघात इको वाहनातील ८ भाविक जखमी झाले. जखमी भाविक भडगाव तालुक्यातील वाडे येथील आहेत.

याबाबत असे की, इको व आयशर वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात इको वाहनातून भाविक सप्तशृंगी गडावरून दर्शन करून घरी जात होते.
जखमींना तातडीने चाळीसगावात खासगी रुग्णालयात आणले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये दगा ज्योतीसिंग परदेशी (७०), दीपक शिवाजी महाजन (४२), संदीप दगा परदेशी (३५), झुंबरबाई परदेशी (३५) सोनाली जगदीश परदेशी (३२), राजेंद्र बाबुलाल पाटील (५६), किशोर रूपसिंग परदेशी (४४), चित्रा किशोर परदेशी (४१) सर्व रा. वाडे यांचा समावेश आहे. दरम्यान जखमींवर उपचार सुरु आहे












