गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव : विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑटो रिक्षाला आयशरची धडक, अनेक जण…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । इच्छापूर-इंदूर महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक हा अपघात झाला आहे. यात ३ जण ठार तर १८ जण जखमी झाले आहे. अपघातातील मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आह.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरलेल्या अॅटो रिक्षाला आयशर टेंपोने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असून दोन विद्यार्थिनी व रिक्षाचालक जागीच ठार झाले. तर 18 विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी बंबरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत

अपघातात ठार झालेले आणि जखमी असलेले विद्यार्थी हे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असून ते सर्वजण बुऱ्हाणनपूरच्या दिशेने जात असताना समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींनी रुग्णालयात पाठवण्यात आले असून ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह बुऱ्हानपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button