जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । कन्नड घाटातील सुरु असलेल्या कामाची पाहाणी दौरा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मंत्री ना.डॉ. भागवत कराड यांचा नुकताच झाला. यावेळी देशाच्या बजेटमध्ये विशेष बाब म्हणून काय प्रोव्हीजन करता येईल का ? यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन दिले.
मराठवाडा खानदेश जोडणारा राज्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कन्नड घाट टनेलसाठी (बोगद्यासाठी) खा.उन्मेश पाटील व ना.नितीन गडकरी यांच्याकडे भक्कम पाठपुरावा सूरू ठेवला आहे. यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री या नात्याने देशाच्या बजेटमध्ये विशेष बाब म्हणून काय प्रोव्हीजन करता येईल का ? यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार डॉ. भागवत कराड यांनी कन्नड घाटातील विकास कामांची पाहणी करताना सांगितले. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- जळगावात शेतकऱ्याच्या कापसाला हमीभावही मिळेना; ‘या’ भावात केला जातोय खरेदी?
- सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; शेतकऱ्यांना होईल असा फायदा?
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू
- विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार : अनिल चौधरी
- जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदी भावात पुन्हा मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा