⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | गुडन्यूज ; खाद्य तेल स्वस्त होणार

गुडन्यूज ; खाद्य तेल स्वस्त होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । पाम तेलासह खाद्यतेलावरील आयात शुल्क घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यामुळे खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १५० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १५० ते १७० रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने २०० रुपयांची पातळी केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट पुरते कोलमडून गेले आहे.

दरम्यान, आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची (११२ डॉलर) कपात केली आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.

आधीच महागाईचा भडका उडाला असता त्यात मागील तीन महिन्यात खाद्यतेलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे सर्वसामन्यांचे गणित बिघडले आहे.  भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १८०-२०० रुपयांच्या घरांत गेले आहे. ‘खाद्यतेलाची आयात घटली आहे. खाद्य तेलावर पाच टक्के जीएसटीदेखील आकारला जात आहे. त्यामुळे खाद्य तेल विक्रमी पातळीवर गेले आहे. सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १५० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १५० ते १७० रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने २०० रुपयांची पातळी केव्हाच ओलांडली आहे.

पाम तेलाच्या आयातीवरील शुल्क कपात गुरुवार १७ जूनपासून लागू झाली आहे. आयात शुल्कातील कपातीमुळे खाद्य तेलाचा आयात खर्च कमी होईल. परिणामी देशात खाद्य तेल काही प्रमाणात स्वस्त होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.