⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर.. खाद्यतेलाच्या किंमती आणखी 30 रुपयांनी स्वस्त होणार

खुशखबर.. खाद्यतेलाच्या किंमती आणखी 30 रुपयांनी स्वस्त होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । वाढत्या खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाची दर घसरत आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्यात सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर खाद्यतेलाच्या दरात कपातीची घोषणा करण्यात आल्यानंतर आता पुन्हा खाद्यतेल लवकरच 30 रुपयांनी स्वस्त (Cheaper) होणार आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (DFPD) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची (One Liter) बाटली आणि पाऊच्या किंमतीत 30 रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.

कंपन्यांची दर कपात
अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात 10 ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर 8 रुपये ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अॅग्री कंपनीने एमआरपीवर 35 रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत 15 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.

सरकारने नुकतीच तेल उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सामान्य जनतेवरील खाद्यतेलामुळे वाढलेला भार कमी करण्यावर जोर देण्यात आला. एवढेच नाही तर कंपन्यांकडून सेवा शुल्काविषयी कंपन्यांकडून सूचना ही मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर कंपन्यांनी तातडीने त्यांच्या तेलाच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.