यंदाच्या नवरात्रीतही खाद्यतेलाचे दर भडकणार? आता असे आहे प्रति किलोचे दर..

सप्टेंबर 18, 2025 9:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२५ । गेल्या वर्षी केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केल्यामुळे खाद्यतेलाची दर भडकले होते. ऐन सणासुदीत हे दर वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. मागच्या सहा महिन्यांत शेंगदाणा, सोयाबीन आणि सनफ्लावर तेलाच्या दरात ५० रुपयांपेक्षाही अधिकची वाढ झाली. यंदादेखील नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाच ते दहा रुपये प्रतिकिलो खाद्यतेल वाढण्याची शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

oil 2

शेंगदाणा तेल १० रुपये वाढले

यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत सूर्यफुलाच्या दरात तब्बल १३ रुपयांनी तर शेंगदाणा तेलात १० रुपयांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती पुढील पंधरा दिवसांत तेलाच्या दरात किलो मागे आणखी ५ ते १० रुपये वाढू शकतात.

असे आहे गतवर्षीचे आणि आताचे तेलाचे दर (किलोचे)

सूर्यफूल : गतवर्षी १५७.. आताचे दर १७० रु.
सोयाबीन : गतवर्षी १४८.. आताचे दर १४५ रु.
शेंगदाणा : गतवर्षी १८०.. आताचे दर १९० रु.
पामतेल : गतवर्षी १३४.. आताचे दर १४५ रु.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now