जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे. देशातील खाद्यतेलाचे भाव घसरल्याने होळीचा (Holi 2023) आनंद द्विगुणीत झाला आहे. दिल्ली तेल-तेलबिया बाजारात शनिवारी जवळपास सर्वच तेलांमध्ये मोठी घसरण दिसून आली. दिल्ली तेल-तेलबिया बाजारात सर्च प्रकारच्या खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्या. Edible oil prices fell
घसरणीचे कारण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, देशात गरजेपेक्षा जास्त खाद्य तेलाची आयात झाली आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे. पण देशातील तेल उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. मोहरी आणि सोयाबीन तेलाचे भाव उतरले आहेत. कपाशी तेलाच्या किंमतीही घसरल्या आहेत. तर कच्चे पामतेल (CPO) , पामोलीन तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमती पूर्वीच्याच दरावर बंद झाले.
जळगावात काय आहे तेलाचा भाव ?
गेल्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीन तेलाचे 900 MLचे पाऊच 131 ते 135 रुपयांवर होते. तर खुले एक किलो सोयाबीन तेलाचा दर जवळपास 143 ते 145 रुपये इतका होता. घाऊक बाजारपेठेत 15 किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर 2150 खाली आले. दुसरीकडे 15 किलो शेंगदाणा तेलाचा दर 3030 रुपयावर आला आहे. मात्र आता सोयाबीन तेलाचे 900 MLचे पाऊच 119 ते 122 रुपयांवर आले आहे. तसेच खुले एक किलो तेलाचा दर 130 ते 135 रुपयावर आले आहे. घाऊक बाजारपेठेत 15 किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर जवळपास 1900 ते 1950 रुपायाखाली आले.
(वरील दर सूचक आहे. अचूक दरांसाठी जवळील दुकानात संपर्क साधावा..)
दिल्लीत शनिवारी तेल आणि तेलबियांचे भाव पुढीलप्रमाणे होते.
मोहरी तेलबिया – रु 5,480-5,530 (42 टक्के स्थिती दर) प्रति क्विंटल
भुईमूग – 6,775-6,835 रुपये प्रति क्विंटल
शेंगदाणा तेल गिरणी वितरण (गुजरात) – रुपये 16,550प्रति क्विंटल
शेंगदाणा रिफाइंड तेल 2,540-2,805 रुपये प्रति टिन
मोहरीचे तेल दादरी – 11,280 रुपये प्रति क्विंटल
मोहरी पक्की घणी – रु. 1,830-1,860 प्रति टिन
मोहरी कच्ची घणी – रु. 1,790-1,915 प्रति टिन
तीळ तेल गिरणी वितरण – रु. 18,900-21,000 प्रति क्विंटल
सोयाबीन तेल मिल डिलिव्हरी दिल्ली – रु. 11,780 प्रति क्विंटल
सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – रु. 11,550 प्रति क्विंटल
सोयाबीन तेल दिगम, कांडला – 10,320 रुपये प्रति क्विंटल
सीपीओ एक्स-कांडला – रु 8,900 प्रति क्विंटल
कापूस बियाणे मिल डिलिव्हरी (हरियाणा) – रु 10,280 प्रति क्विंटल
पामोलिन RBD, दिल्ली – रु. 10,440 प्रति क्विंटल
पामोलिन एक्स- कांडला – रु 9,480 (जीएसटी शिवाय) प्रति क्विंटल
सोयाबीनचे धान्य – रु 5,405-5,535 प्रति क्विंटल
सोयाबीन लूज – रु 5,145-5,165 प्रति क्विंटल
मक्याचा खल (सारिस्का) – रुपये 4,010 प्रति क्विंटल