---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मंदाताई खडसे यांना पुन्हा ईडीचे समन्स : उद्या होणार चौकशी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ ।  पुण्याच्या भोसरी येथील विवादास्पद भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी व जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना  ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. याआधी त्यांनी समन्ससाठी  मुदत वाढवून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

Untitled design 4 3 jpg webp

भोसरी येथील एक भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दुसर्‍या चौकशीच्या दरम्यान खडसे यांनी पूर्ण सहकार्य करत हव्या त्या वेळेस गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात ५ जुलै पासून ईडीच्या अटकेत आहेत.

---Advertisement---

भोसरी येथील भूखंड हा गिरीश दयाराम चौधरी आणि मंदाताई एकनाथराव खडसे यांनी संयुक्तरित्या खरेदी केला होता. यामुळे मंदाताईंना याआधी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. तेव्हा त्यांनी चौकशीआधी वेळ मागून घेतला होता. ईडीने ही मागणी मान्य केल्याने त्यांची चौकशी ही पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, यानंतर आता ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले असून उद्या दि. १८ ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---