---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

गिरणा ऑर्गेनिक फार्मिंग क्लस्टरसाठी लोकसभेत खा. उन्मेष पाटील यांची मागणी

---Advertisement---

जळगाव-लाईव्ह न्यूज | ७ एप्रिल २०२२ । गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर) उभारण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली. जिल्ह्यातील गिरणा नदी प्रदूषीत झाली असल्याने गंगा नदीच्या पार्श्‍वभूमिवर खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गिरणेला पुनर्जीवीत करण्याचा संकल्प केला असून यासाठी त्यांनी गिरणा परिक्रमा यात्रा काढलेली आहे.

आजची गिरणा नदीची सद्यस्थिती जाणून घेत यातून आढळून आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. यासोबत आता त्यांनी लोकसभेतही गिरणा विकासाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. यात त्यांनी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर (कॉरिडॉर) निर्माण करण्याची मागणी केली आहे.. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एक जानेवारी पासुन गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत सुमारे चारशे किलोमीटर ची पाईप आज येत पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेत ते गावोगावी जाऊन शेतकर्‍यांची सुसंवाद साधला असून गिरणा काठाच्या शाश्वत विकासाची विकासासाठी सोबत काम करण्याचे आवाहन करत आहे.

याच अनुषंगाने आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गिरणा माईच्या काठावर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून केंद्र सरकारने याबाबत खासदार पाटील म्हणाले की, ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्‍यावरील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा केली आहे त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर) ची योजना राबविण्याची आवश्यकता आहे. या प्रश्नाच्या उत्तरात देशाचे कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न बद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्न आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे क्षेत्र व शेतकरी बांधवांची संख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून जैविक शेती, परंपरागत कृषी विकास योजना या महात्वाकांक्षी योजना शासन राबवित आहे. या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात नमामी गंगे प्रकल्पांतर्गत गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर करिता रक्कम रु.१२० कोटी ची तरतुद करण्यात आली असल्याचे नमूद केले. तसेच गिरणा नदी ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर) करिता व गिरणा नदी जल प्रदूषण मुक्त होण्याकरिता राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास या योजनेस मंजुरी देण्याची खात्री मंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.

गिरणा पुनरूज्जीवन अभियानाअंतर्गत गिरणा काठ अधिक समृद्ध होण्यासाठी किनार्‍यावरील शेतकर्‍यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा आग्रह उन्मेशदादा पाटील हे आपल्या गिरणा पदयात्रेतून करीत आहे. गिरणा परिक्रमेत आत्तापर्यंत हजारो ग्रामस्थ, शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असा आग्रह धरला आहे. आज गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या केंद्र सरकारच्या मनोदयाने गिरणा काठाच्या समृद्धीचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारने प्रस्ताव पाठवताच गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर प्रत्यक्षात साकारला जाणार असल्याने एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---