जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी आज ई- लिलाव प्रक्रिया

मार्च 4, 2022 3:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । जिल्ह्यातील खाणकाम आराखडा मंजूर असलेल्या २१ वाळू गटांचे शुक्रवारी रोजी ई-लिलाव करण्यात येणार आहेत.

valu

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून ई- निविदा भरलेल्या व्यक्ती, संस्थांना ई-लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या इसारा रक्कम भरलेल्यांना ई-ऑक्शनसाठी ऑनलाइन पध्दतीने संगणकीय प्रणाली वेबसाइटवर खुली करून देण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ई-लिलाव ऑनलाइन सुरू राहील. त्यानंतर ई-लिलावासाठी मुदत वाढवून दिली जाणार नाही. दुपारी ३ वाजेपासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात ई-लिलावाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा ६०० रुपये प्रती ब्रासप्रमाणे बेस प्राइसनुसार वाळू गटांचा लिलाव हाेणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now