शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

फेब्रुवारी 26, 2026 4:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नुकताच शेगावचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय,रूग्णालय आणि रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात सेवा देत नागरिकांची तपासणी केली व मार्गदर्शन केले.हा आरोग्य मेळा दि २८ फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे.

drsarode

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,आयुष मंत्रालय,भारत सरकार द्वारा अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन च्या माध्यमातून संत गजानन महाराज संस्थान,शेगाव येथे दिनांक:-२५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेला-२०२६ चे आयोजन करण्यात आलेले आहे.या संदर्भातील आढावा बैठकी दरम्यान अधिष्टाता डॉ हर्षल बोरोले यांनी केंद्रीय आयुष मंत्री मा. श्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन कार्यक्रमातील आपल्या संस्थेच्या सहभागाबद्दल माहिती दिली. या माध्यमातून आपल्या संस्थेने सामाजिक भावना जपत या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे

New Project 15

या आरोग्य मेळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु , महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त अथक प्रयत्नातून हा मेळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात आयुर्वेद, योग, सिद्ध, यूनानी, सोवा-रिग्पा व होमिओपॅथी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निःशुल्क आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि औषधे दिली जात आहेत.

राष्ट्रपतींंनी औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व सांगितले आणि शेतकर्‍यांनी वनऔषधींची लागवड वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की आरोग्य आणि परंपरागत भारतीय औषधपद्धतींना जोडून जीवनशैली सुधारली पाहिजे, आणि त्यामुळे देशाचा आरोग्यदर्जा वाढेल. हा मेळा नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध आयुष सेवांचा प्रचार-प्रसार, शेतकर्‍यांसाठी औषधी शेती मार्गदर्शन आणि आरोग्य शिक्षण यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now