⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | पुणे-अयोध्या एक्स्प्रेसचा कालावधी महिनाभर वाढला ; जळगाव, भुसावळला आहे थांबा

पुणे-अयोध्या एक्स्प्रेसचा कालावधी महिनाभर वाढला ; जळगाव, भुसावळला आहे थांबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । रेल्वे प्रवाशांसह रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे-अयोध्या या स्थानकादरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. या गाडीचा कालावधी महिनाभर वाढवण्यात आला असून, एकूण १४ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे-अयोध्या (गाडी क्र. ०१४५५) ही उन्हाळी विशेष गाडी ७ मेपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती; परंतु वाढत्या गर्दीमुळे या गाडीचा कालावधी आता ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुण्याहून दर शुक्रवारी आणि मंगळवारी एकूण सात गाड्या धावणार आहेत, तर अयोध्या-पुणे (गाडी क्र. ०९४५६) ही उन्हाळी विशेष गाडी ९ मेपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती.

आता या गाडीचा कालावधी २ जूनपर्यंत वाढवला आहे. अयोध्या येथून दर रविवारी आणि गुरुवारी एकूण सात गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना जळगाव, भुसावळला थांबा असून प्रवाशांना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

या स्थानकांवर असेल थांबा
चिंचवड, लोणावळा, पानेवल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरगणलक्ष्मीबाई, ओराई, कानपू, लखनौ.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.