⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

गोदावरी पायरेक्झीया २४ अंतर्गत फुटबॉल स्पर्धेवर डीयुपीएमसी जळगावचे वचर्स्व

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या मैदानात पायरेक्झीया २४ अंतर्गत फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. याचबरोबर सामनावीर,बेस्ट डिफेंडर, बेस्ट स्ट्रायकर पारितोषीक पटकावत स्पर्धेवर वर्चस्व राखले.

संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, सदस्य डॉ. अनिकेत पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि रजीस्ट्रार प्रमोद भिरूड इ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फुटबॉल किक मारून १७ मार्च रोजी शुभारंभ करण्यात आला. चार गु्रपमध्ये एकुण १६ संघानी सहभाग नोंदवला. उपांत्य फेरीत डीयुपीएमसीने जीएमसी चंद्रपूर संघाचा २ विरूध्द ० तर भारती विदयापिठ सांगलीने बीकेएल वालवलकर रत्नागिरीचा १ विरूध्द ० गोलने पराभव करीत अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामना २१ मार्च रोजी खेळवला यात भारती विदयापिठ सांगली संघाने सामन्यात वर्चस्व राखत डीयुपीएमसी जळगाव १ विरूध्द ० गोलने पराभव करीत विजेेतेपद पटकावले.

याचबरोबर डीयुपीएमसीचे डॉ. अमीत साखरे सामनावीर,डॉ.किसन दुधानी बेस्ट डिफेंडर, डॉ. चंदन मोर्या बेस्ट स्ट्रायकर तर बेेस्ट गोलकिपर पुरस्कार डॉ. अभिषेक चंद भारती विदयापिठ सांगली यांनी पटकावला. संर्पुण स्पर्धेसाठी पंच म्हणून पंकज तिवारी काम पाहीलेे. विजेत्या संघास चषक,१११११ रोख,मेडल तसेच प्रमाणपत्र तर उपविजेता संघास संघास चषक,६६६६ रोख,मेडल तसेच प्रमाणपत्र तसेच सामनाविर ३३३३ रोख व चषक व प्रत्येक खेळाडूस प्रमाणपत्र अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. चैतन्य पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ किसन दुधानी, अमीत साखरे, मोहम्मद नजीफ,डॉ संकेत गायकवाड हयांनी परिश्रम घेतले.