जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागामार्फत द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गिट हब ‘या विषयावर दिनांक २५ व २६ एप्रिल २०२४ रोजी कार्यशाळा घेण्यात आली.सदर कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, संगणक विभाग प्रमुख प्रा.निलेश वाणी, प्रमुख मार्गदर्शक प्रा. योगेश फेंगडे तसेच विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा.निलेश वाणी यांनी विद्यार्थ्यांना वर्कशॉप संदर्भात माहिती देताना आयोजनाचे महत्त्व,गिट हब म्हणजे काय?महत्त्व काय? त्यावर कसे कार्य करावे? आपला प्रोग्रामिंग कोड क्लियर व क्लीन ठेवायचा असेल तर या वर्कशॉप च्या माध्यमातून सर्व माहिती मिळेल हे सांगितले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रत्येक विद्यार्थ्याने हँडस ऑन प्रॅक्टिस करून स्वतःला त्या विषयामध्ये एक्सपर्ट करावे असे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. योगेश फेंगडे यांनी दोन दिवसाच्या सत्रात गिट हब चे वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली बद्दल सांगताना त्यांनी डिस्ट्रीब्यूटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम च्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूटेड वर्जन मल्टिपल युजर्स एकाच वेळी भिन्न वर्जन वर कसे काम करतात.
त्रुटी उद्भवल्यास, काही प्रोग्रामर त्या त्रुटीला सॉल्व करतात आणि नवीन वर्जन लाँच करतात जेणेकरून इतर वापरकर्त्यास कोणतीही अडचण येऊ नये.गिटहबच्या मदतीने आपण एक छोटी वेबसाइट होस्ट करू शकतो. गिटहब वर, आपण लिहिलेल्या कोडचे रिव्ह्यू करू शकतो आणि त्या कोडवर टिपण्या घेऊ शकता. तसेच गिटहबच्या वेबसाइटवर इंटिग्रेशन डिरेक्टरी देखील आढळते.या वर्कशॉप मध्ये गिट हब प्लॅटफॉर्मची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि त्यावरती प्रात्यक्षिक घेण्यात आले.विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ.केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.प्रशांत शिंपी यांनी केले.