---Advertisement---
गुन्हे

डंपरने घेतला एस. टी. कर्मचार्‍याचा जीव !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

accident jpg webp webp

जामनेर येथ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या डंपर ने दुचाकीला धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर ( वय ३२ राहणार पाळधी, ता. जामनेर ) या एसटी कर्मचारी चा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

---Advertisement---

जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर व मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकी वर जात असताना जामनेर कडे येणार्‍या डंपर वाहनाने समोरून धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर राहणार पाळधी हल्ली मुक्काम जामनेर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून नितीन सोनवणे हे जखमी झाले आहेत.

जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मयत निलेश बडगुजर हे जामनेर एसटी डेपो क्लर्क या पदावर कार्यरत होते. सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी टाहो फोडला. निलेश यांच्या पक्षात पत्नी व एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---