⁠ 
रविवार, मे 19, 2024

कोरोनामुळे यावल आगारातील बससेवा पूर्ण बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९  मे २०२१ । संपुर्ण राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा ही सर्तक व सज्ज असतांना ही कमी होतांना दिसुन येत नसुन या महामारीचा प्रसार ग्रामीण भागात अत्यंत वेगाने वाढतांना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ग्रामीण भागातील जवळपास सर्वच एसटी बससेवा ही पुर्णपणे थांबवल्याने ग्रामीण भागातील नागरीकांची लाईफलाईन व दळणवळणाच्या साधनावर मोठा परिणाम जावणत आहे.

यावल एसटी आगारातुन तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० गावामध्ये २४शेड्डलय फेऱ्याव्दारे ही सेवा दिली जाते. सर्वसामान्यांची आवडती लालपरी ही जणु मागील काही महीन्यांपासुन प्रवासांची रुसली आहे की काय असे ही ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे . यावल एसटी आगारातुन लॉकडाऊन पुर्वी एकुण ७२ शेडुअल फेऱ्या सोडल्याजात असे , १४ लांब पल्यांच्या १४ फेऱ्या , मध्य पल्यांचा ६ फेऱ्या तर८ अंतरराज्य फेऱ्यांची बससेवा प्रवासांसाठी दिली जाते.

मात्र कोरोनाच्या लॉक डाऊन गोंधळामुळे यावल आगारातुन अत्यंत मोजक्या बससेवा प्रवासांसाठी सोडण्यात येत असल्याने अनेक प्रवासांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी अवैध मार्गाने चालत असलेल्या खाजगी वाहनाने मनमानी भाडे आकारणी देवुन प्रवास करावा लागत आहे . कोरोनाच्या महामारीचे उच्चाटन होवुन सर्वस्थिती पुर्व पदावर सामान्य होई पर्यंत आपल्या गावात सुखरूप व सुरक्षीत पहोचवणाऱ्या लालपरीची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार हे सत्य आहे.