जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दरम्यान, ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब असलेला अर्थसंकल्प असल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर करताना सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच शेती फायदेशीर व्हावी यासाठी 30 लाख शेतकऱ्यांना महाविस्तार या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब असलेला अर्थसंकल्प असल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.







