---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात रंगली मराठी काव्य वचन स्पर्धा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । जळगाव येथील डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात न्युरोफिजिओथेरपी विभागा तर्फे डॉ अस्मिता काडेल यांच्या मार्गदर्शना खाली मराठी भाषा गौरव दिन निमित्त मराठी कव्या वचन स्पर्धा घेण्यात आली.

marathi kavy vachan jpg webp

यास्पर्धे मध्ये विद्यार्थ्यानी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत मराठी काव्य वचन केले स्पर्धेचे उद्घाटन कॉलेज चे प्राचार्य डॉ. जयवंत नगूलकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. नगुलकर यांनी मराठी भाषा ही काळाच्या ओघात क्षीण न होउ देता आपण तिला जपायला हवी, मराठी ही आपली अस्मिता असून तिच्या काव्य आणि लिखानाची प्रतिभाच वेगळी आहे. या स्पर्धे मध्ये एकूण १५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवत वचन केले. त्यापैकी अंतिम वर्षातील विद्यार्थी अंकित राऊत याला प्रथम क्रमांक तसेच दूसरा क्रमांक तृतीय वर्षातील सुमेधा भावसार आणि अंतिम वर्षातील हेमंगी चौधरी हिने तिसरा क्रमांक पटकावला.विजेत्यांचे प्रशस्ती पत्र देवून कौतुक करण्यात आले, कार्यक्रमला डॉ अंकित माने,डॉ.चैताली नेवे,डॉ. वृषाली मुगल हे उपस्तीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचाल व आभार प्रदर्शन डॉ. अक्षता माहा यांनी केले.

---Advertisement---

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

marathi din

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती गोदावरी आई पाटील यांच्यासह प्रमुख वक्ता म्हणून प्रा. व.पु. होले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक), प्रा. अतुल बर्‍हाटे (तंत्रनिकेतन अधिष्ठाता) व सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूजा करून करण्यात आली.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी जीवनात मराठी भाषेचा वापर कसा केला पाहिजे व आपलेच ग्रंथ जीवनात एकदा तरी अंमलात आणले पाहिजे हे नमूद केले.

प्रा. व.पु.होले यांनी सांगितले जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रंथालयात जा. शेवटच्या श्वासापर्यंत काय केले पाहिजे हे वाचनातून कळेल. जीवन जगताना नीतिमूल्य सांभाळा व तसे वागा. उद्दिष्ट ठेवा की मला समाधानाने जीवन कसं जगता आलं पाहिजे, मला माझं कौशल्य कसं वाढवता आलं पाहिजे. या संबंधित त्यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज चौधरी यांनी केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---