जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके,वैद्यकिय संचालक डॉ. एन आर्विकर, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामाच्या ठीकाणी होणाऱ्या अप्रिय घटनांना आळा बसावा आणि सुरक्षीत वातावरण निर्माण व्हावे, या उददेशाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात समीती गठीत करण्यात आली असून विविध प्रतिनीधींची नियुक्ती करण्यात आली.
या समीतीत डॉ. एन एस आर्विकर हे वैद्यकिय संचालक, अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके तर सचिवपदी प्रमोद भिरूड यांची सर्वोनुमते निवड करण्यात आली. विविध विद्या शाखेचे प्राध्यापक, कर्मचा यांचे प्रतिनिधी,निवासी वैद्यकिय अधिकारी प्रतिनिधी, पुरूष व महिला विद्यार्थी प्रतिनिधी, सुरक्षारक्षक प्रतिनिधी, तंत्रज्ञ प्रतिनिधी तसेच पत्रकार प्रतिनिधीची निवड करण्यात आली आहे.
आजच्या बैठकीत कायद्याचे पालन,लैंगिक छळ प्रतिबंध, सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचे वातावरण निर्मीती,कर्मचार्यांसाठी संरक्षण,कर्मचार्यांचे मनोबल आणि कामात सुधारणा,सकारात्मक सार्वजनिक प्रतिमा या मुदयावर उपायांची चर्चा देखिल करण्यात आली. तसेच समीतीच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्मीतीसाठी वेळोवेळी आढावा घेण्याचा देखिल निर्णय सर्वोनुमते पारीत करण्यात आला.