जळगाव शहर

कोमात गेलेल्या बालिकेचा पुर्नजन्म

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । आये थे रोते रोते…, जा रहे है हसते-खेलते… हे शब्द कुठल्या गाण्यातील नसून ही एक वास्तव आहे.. डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयातील बालरोग तज्ञांच्या प्रयत्नांमुळे हिपॅटिक कोमात गेलेल्या दोन वर्षीय आलिनाचा झाला पुर्नजन्म आणि त्याचा आनंद व्यक्‍त केला आलिनाच्या माता-पित्यांनी…

जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील रहिवासी हुसैन पांडे हे मिस्तरी काम करीत असून त्यांच्या दोन वर्षीय मुलीची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांकडे नेले. मात्र बाळाची शुद्ध हरपून जाऊन गंभीर अवस्थेत पांडे कुटूंबिय २० मे रोजी रडत-रडत डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात पोहोचले. बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.विक्रांत देशमुख, डॉ.गौरव पाटेकर, निवासी डॉ.दर्शन, डॉ.चंदाराणी यांनी बाळाला पाहिले असता बाळाला प्रचंड ताप होता, तातडीने अ‍ॅडमिट करुन घेत लिवर फंक्शन टेस्टही केल्यात.

यासंदर्भात बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर यांनी सांगितले की, सदर टेस्ट ह्या स्ट्राँगली पॉझिटीव्ह आल्या असून बाळ हिपॅटिक कोमात गेल्याचे निदान आम्ही केले. त्यानुसार ट्रिटमेंट सुरु केली. काही दिवसांनी बाळाला शुद्ध आली परंतु या आजारात रुग्णाची वाचा जाते आणि तशी आलिनाचीही गेली. बाळ शुद्धी आल्याचा आनंद पालकांना होताच परंतु ती बोलत नाही याचे दु:खही होते. हिपॅटिम कोमा हा आजार दुमिळ नसला तरी यात वाचा परत येणे अवघड असते परंतु आम्ही आवश्यक औषधोपचार केले आणि बाळ बोलायला लागले, संपूर्ण आजारातून बाळ पूर्णपणे बरे झाल्याने नातेवाईकांनी आभार मानले.

आये थे रोते रोते
आपले बाळाला अनेक दिवस बेशुद्ध पाहणे, त्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शुद्ध आली पण बोलणे बंद झाले मात्र डॉक्टरांच्या उपचाराने आमचे बाळ आज हसत-खेळत आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेत येथे उपचार झाले. आम्ही येथे आलो तेव्हा रडत रडत आलो मात्र आज हसत हसत घरी जात आहोत असे बालिकेचे वडिल हुसैन पांडे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button