जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात नाक-कान-घसा तज्ञ म्हणून मुंबईच्या डॉ. सृष्टी पाटील यांची सेवा रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुळच्या मुंबई येथील रहिवासी असलेल्या डॉ. सृष्टी पाटील यांचे एमबीबीएसचे शिक्षण हे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून झाले. त्यानंतर एनबीई नवी दिल्ली येथून त्यांनी डीएनबी केले. मिरज, सांगली, पुणे येथे त्यांनी सेवा दिली आहे.
आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात नाक-कान-घसा तज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरजू रूग्णांसाठी डॉ. सृष्टी पाटील यांची आरोग्यसेवा दैनंदिन ९ ते ५ पर्यंत राहणार आहे. तरी रूग्णांनी त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.