चिमणराव पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले : डॉ.सतीश पाटलांचा टोला

जुलै 4, 2021 1:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयात एक क्लीप व्हायरल होत असून ती माझ्या संदर्भात असल्याने मला त्यावर खुलासा करावा वाटतो. आमदारांनी २०१४ चा निवडणुकीत माझा पराभव घडवून आणला असे वक्तव्य त्यांनी केले. आम्ही काही जबरदस्तीने शिक्के मारून निवडून आलो नाही. आमचे जे आहे ते स्पष्ट आहे. बहुदा वय वाढते तशी मानसिक स्थिती बिघडत जाते म्हटले जाते हा प्रकार देखील तसाच असल्याचे वाटते असा टोला माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी विद्यमान आ.चिमणराव पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.

dr satish patil chimanrao patil

डॉ.सतीश पाटील पुढे म्हणाले की, आ.चिमणराव पाटील यांनी पक्षात माझी घुसमट होत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे चिमणराव पाटलांचा एक पाय शिवसेनेत आणि एक पाय भाजपामध्ये आहे. शिवसेनेने बाहेर काढले की भाजपात जायचा त्यांचा विचार असावा, असेही ते म्हणाले. शिवसेनेने जिल्हाप्रमुख नेमताना मला विश्वासात घेतले नाही असे चिमणराव पाटलांनी सांगितले.

Advertisements

नवीन जिल्हाप्रमुख मुळे झोप उडाली असे त्यांना वाटते पण आपण विचार करावा की डॉ.हर्षल मानेमुळे झोप उडाली असे काय केले त्यांनी असा प्रश्न उपस्थित होतो. सर्वच पदे आपल्याकडे घ्यायची, न्याय कुणाला द्यायचा नाही असा हा प्रकार आहे. आपल्या मुलाला पद मिळविण्यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याला मोठे होवू द्यावे, असा सल्ला देखील डॉ.पाटील यांनी दिला. तसेच आमचा पक्ष वाढत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे ते म्हणाले.

Advertisements

पहा व्हिडीओ :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now