दत्तात्रय चव्हाण म्हणजे आरोग्याचे स्वच्छतादूतच ; डॉ प्रदीप लासुरकर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । आरोग्य केंद्रात कोरोना काळात चोख पणे सेवा बजावणारे दत्तात्रय चव्हाण म्हणजे आरोग्याचे स्वच्छतादूतच असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी व्यक्त केले.

धानोरा ता.चोपडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय चव्हाण ३१ ऑक्टोबर रोजी आपली १९ वर्ष प्रथम पंचायत समिती चोपडा येथे तद्नंतर धानोरा प्रा. आ.केंद्रात चोख पणे सेवा बजावून सेवा निवृत्त झाले. म्हणून दत्तात्रय चव्हाण आणि आरोग्य सेवक मोतीलाल माळी यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले, पोलिस पाटील नरेंद्र पाटील (लोणी), जितेंद्र मोरे, सुशील सोनवणे, जे.वाय. बाविस्कर, दिलवर वळवी, नितीन लोलगे, डॉ. फारुख शेख, सी.पी.पाटील, नितीन महाजन, प्रदीप अडकमोल, डी. एस.माळी,कल्पना सूर्यवंशी, मोनाली पाटील,भिकूबाई बोडदे, भारती सोनवणे, दिपमाला महाजन,करुणा चौधरी, प्रवीण ठाकूर,विलास पवार, मांगीलाल पावरा आदी उपस्थित होते.

दत्तात्रय चव्हाण यांनी आपल्या सेवार्थ काळात स्वच्छतेला महत्त्व दिले असून ते आरोग्य क्षेत्रातील खरे स्वच्छता दूत म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रा.आ.केंद्रात प्रत्येक येणाऱ्या रुग्णांशी एक सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या श्री चव्हाण यांची उणीव भरून न येण्याजोगी असल्याचे डॉ. लासुरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन लोलगे यांनी तर आभार सी. पी. पाटील यांनी मानले.