जळगाव जिल्हा
अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे यांची रक्तदानाची नाबाद अर्धशतकी खेळी
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे यांनी सलग ५० वेळा रक्तदानाची नाबाद अर्धशतकी खेळी पुर्ण केली आहे.
आपल्याला रक्ताची कमतरता असल्यास रक्त लावावे लागेल किंवा शस्त्रक्रियेनंतर रक्त लागेल असे सांगणारे डॉक्टरच जेव्हा माणूसकीच्या नात्याने रक्तदान करतात आपण क्वचितच असा प्रसंग पाहिला असेल पण जळगावातील अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे याला अपवाद ठरले आहे.
१८ व्या वयापासून आता जवळपास ४५ वय असलेल्या डॉ.धांडे यांनी १७ वर्षात ५० वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला आहे. जागतिक रक्तदान असो वा डॉक्टर डे किंवा आय एम ए च्या रक्तदान शिबिरात आर्वजून रक्तदान करतातच परंतू अनेकदा रूग्णांना आवश्यकता असतांना देखिल त्यांनी रक्तदान केले आहे. अशा डॉ. नितीन धांडे यांचा चॅम्पस परिवारातर्फे केलेल्या कामगिरीबददल सत्कार करण्यात आला.