आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

फेब्रुवारी 11, 2026 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील डॉ. निकेतन जाधव यांनी नाशिक येथे पार पडलेल्या आरोह-२०२६ या आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत यश संपादन केले आहे.

aniketan jadhav

या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील २० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयातील डॉ. निकेतन जाधव यांनी ए मेरे दिल तू गाये जा या गीतावर नृत्य सादर केले.

Advertisements

त्यांच्या नृत्याने स्पर्धेत चांगलीच धम्माल उडवून दिली. त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रशांत गुडेट्टी यांनी डॉ. निकेतन जाधव यांचा गौरव केला. तसेच माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील यांनीही डॉ. निकेतन जाधव यांचे कौतुक केले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now