⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

वैजापूर येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन

आदिवासी बंधू-भगिनी समवेत डॉ.केतकी पाटील यांनी घेतला पारंपरिक पावरा नृत्याचा आनंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२४ । चोपडा तालुक्यातील वैजापूर या ठिकाणी भरलेल्या भोंगर्‍या बाजारास आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी आदिवासी बंधू-भगिनी समवेत त्यांनी पारंपारिक आदिवासी ढोलाच्या तालावर नृत्याचा आनंद लुटला. याचबरोबर या आदिवासी महोत्सवात आदिवासी बंधू आणि भगिनींशी संवाद साधून त्यांच्या पावरा भाषेचा गोडवा जाणून घेतला, बाजारातील अनेक पारंपारिक पदार्थांची खरेदी करून आनंद लुटला.

वैजापूर तालुका चोपडा येथे आदिवासी समाजाच्या रूढी परंपरेनुसार भोंगऱ्या बाजार हा गेल्या अनेक वर्षापासून भरवला जातो याचा इतिहास ज्ञात नसला तरी या भोंगऱ्या बाजारामुळे आदिवासी समाजातील संस्कृती आणि परंपरा टिकून राहिली आहे.या बाजारात खाद्य पदार्था पासून, गृह सजावट, खेळणी यासह बऱ्याच बाबींचा समावेश दिसून आला. आदिवासी पाड्यातील बाजाराच्या विशिष्ट दिवशी भोंगऱ्या बाजार भरतो. या बाजाराचे महत्त्व जाणून घेत डॉ केतकी पाटील या सहभागी झाल्यात, या प्रसंगी आदिवासी बंधू भगिनीसोबत नृत्य करून आनंद लुटला.

bongara bajar
वैजापूर येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन 1

यावेळी डॉ.केतकी ताई पाटील यांच्या सोबत चोपडा येथील मोरचिडा येथील रोहित शिवराम पावरा, सौ.ममता पंडित पावरा, अमोल शिवराम पावरा, पंडित छत्रसिंग पावरा, पंकज गुलाब पाटील, अधिकार सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.