⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठीचा संकल्प करा ; डॉ केतकी पाटीलांचे जनतेला आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करुन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावे असे आवाहन संपर्क दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी केले.

मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, पक्षाची ध्येय धोरणे पोचवण्याचे कार्य या संपर्क दौऱ्या दरम्यान डॉ केतकी ताई पाटील करीत आहे. यावेळी नवमतदारांनी देखील उत्साहाने मतदान करून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात मोलाचा सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. केतकीताई पाटील यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी संवाद साधण्याचा धडाका लावलेला आहे. या संपर्क अभियानांतर्गत त्यांनी 13 मार्च रोजी थोरगव्हाण आणि उदळी येथे भाजपचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी चा संकल्प सर्वांनी करावा आणि त्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी थोरगव्हान येथे माजी सरपंच निर्मला अरविंद झोपे, प्रीतम झोपे, बूथ प्रमुख महेश बावस्कर, सतीश चौधरी सचिन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई तायडे, हेमलता बावस्कर, नम्रता कोल्हे, माजी सरपंच कविता चौधरी, महिला आघाडी सोशल मीडिया उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य आशा सुपडू मोरे, माजी सरपंच सुपडू धोंडू मोरे, उमेश खंडू कोल्हे आदि उपस्थित होते.