⁠ 
शनिवार, मे 4, 2024

डॉ. जगदीश पाटील एम.ए. एज्युकेशन ‘अ’ प्लस श्रेणीत उत्तीर्ण

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। भुसावळ येथील रहिवासी व बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील हे एम. ए. एज्युकेशन अ प्लस श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या बहिस्थ माध्यमातून एम. ए. शिक्षणशास्त्र या पदवीसाठी एप्रिल 2023 मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात डॉ. जगदीश पाटील यांनी 72.42 टक्के गुण मिळवून अ प्लस श्रेणीत यश संपादन करत ते उत्तीर्ण झाले आहेत. याआधी त्यांनी मराठी विषयात एम. ए. व पीएच.डी. केली असून यूजीसी नेट परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केली आहे.