जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून डॉ. ठाकूर यांना तातडीने जळगावचा पदभार सोडून बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहेत. डॉ. ठाकूर यांच्या विरोधात तक्रारी असल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याचे समजते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव पदाचा अतिरिक्त कार्यभार 23 नोव्हेंबर 2022 पासून डॉ. गिरीष ठाकूर, प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र हा पदभार अचानक काढून घेत डॉ. सदानंद भिसे यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या संभाळून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा असे शासन आदेशात म्हटले आहे. डॉ. गिरीष ठाकूर यांनी त्यांच्या प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.