जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । आयएमए महाराष्ट्र शाखेची नुकतीच वार्षिक बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत २०२१-२२ या वर्षासाठी राज्य कार्यकारिणीत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्र शाखा अध्यक्षपदी मुंबई येथील डाॅ. सुहास पिंगळे तर सचिवपदी डाेंबिवली येथील मंगेश पाटे यांची निवड करण्यात आली.
जळगाव येथील डाॅ. स्नेहल फेगडे यांची इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या एएमएस कमिटीच्या चेअरमनपदी पुन्हा निवड झाली. हाॅस्पिटल बाेर्ड ऑफ इंडियाच्या राज्य सचिवपदी डाॅ.अनिल पाटील यांची निवड झाली. डाॅ.फेगडे यांना प्रेसिडेंट ऍप्रिसिएशन अवाॅर्ड देण्यात आला.