डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर

मार्च 1, 2022 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । शहरातील सरदार वल्लभाई पटेल (लेवा भवन) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

raktdan jpg webp

सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात २५० जणांनी रक्तदान केले.

यावेळी आ. राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आदींनी रक्तदान शिबिराला भेट देऊन प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now