---Advertisement---
बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे साजरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदनाने झाली.

db

या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. प्रियदर्शनी मून, प्रा. पियुष वाघ व डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांची विशेष उपस्थिती होती. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषण, कविता व गीत सादर केली.

---Advertisement---

बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचे स्मरण करत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले व संपूर्ण परिसरात जयंतीचा प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment