जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे आज बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

एरंडोल नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी कीरण देशमुख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी विनोद पाटील, आनंद दाभाडे, कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी, राजेंद्र पाटील, अनिल महाजन, भूषण महाजन,शालिग्राम गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख,प्रा.नितीन पाटील हे उपस्थित होते.