मोफत रेशन मिळत नाही? रेशन दुकानदार करतोय झोल? लावा फक्त एक कॉल अन् लागेल त्याची वाट
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । सरकार कडून मिळणारे मोफत धान्य मिळणे हा प्रत्येका नागरिकाचा हक्क आहे. मात्र जर तुमचा रेशन दुकानदार तुम्हाला मोफत रेशन देत नसेल किंवा रेशनसाठी पैशाची मागणी करत असेल तसेच अजून दुसऱ्या मार्गाने झोल करत असेल, घोटाळा करत असेल तर तुम्ही कुठे व कशी तक्रार करावी ह्याविषयीं हि माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तर तुम्ही काय करू शकता ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर अश्या वेळी तुम्ही ज्याच्या रेशन कार्ड पोर्टल वर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. तसेच जर आपल्याला ऑनलाईन तक्रार नोंदवायची नसेल तर तुम्ही शासनाच्या नंबर वर कॉल करून देखील तक्रार नोंदवू शकता. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी रेशन कार्ड संबंधित तक्रार करण्यासाठी 1800-22-4950 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.
ऑनलाईन तक्रार कशी कराल ?
रेशन संबंधित तक्रार ऑनलाईन पद्धत्तीने नोंदवायची असेल तर आपण https://nfsa.gov.in/ या लिंकवर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता. ह्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमची तक्रार ही ई-मेल द्वारे कळवावी लागते. जर तुम्ही नुकतेच रेशन कार्ड बनवले असेल आणि तुम्हाला त्या रेशनकार्डसाठी रेशन दिले जात नसेल, तरीही तुम्ही या माध्यमांद्वारे त्याबद्दल तक्रार करू शकता. देखील तक्रारीसाठी अजून काही पर्याय उपलब्ध आहेत ह्या पर्यायाचा वापर करून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीएमओ पोर्टलद्वारेही तक्रार नोंदवू शकता.
याच बरोबर तुम्ही पीएमओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘राइट लेटर टू पीएम’ या पर्यायावर क्लिक करून देखील आपली तक्रार नोंदवू शकता.मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की केंद्र सरकारने आपल्या मोफत रेशन देण्याचा कालावधी वाढवला आहे, तसेच राज्य सरकारने मात्र मोफत रेशन देने बंद केले आहे म्हणुन आता फक्त महिन्यातून एकदाच मोफत रेशन मिळत आहे जे की केंद्र सरकारकडून दिले जात आहे. आता रेशन कार्ड धारकांना महिन्यातून दोनदा एकदा रेगुलर रेशन जे आपण ठराविक पैसे देऊन घेतो आणि दुसरे मोफत मध्ये रेशन मिळते जे शासन आपल्याला पुरवते.