जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । राज्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत असून यामुळे गुन्हेगारांना जणू पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. अशातच दोंडाईचा-जळगाव बस चालकास रस्त्यात बस अडवून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे काही वाहन चालकांनी चारचाकी वाहन एसटी बसला आडवे लावत बस थांबवली. त्यानंतर बसमध्ये चढून थेट बस चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.बसमध्ये उपस्थित प्रवाशांनी या मारहाणीला विरोध देखील केला. परंतु वाहनाला कट का मारला? या कारणावरून ही मारहाण झाली असून, यामध्ये मारहाण झाल्यानंतर बस चालकाने प्रवाशांच्या आग्रहानंतर पोलीस ठाण्यात बस नेत त्यासंदर्भात तक्रार दिली आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास नरडाणा पोलीस करीत आहेत. अशाप्रकारे बस चालकाला रस्त्यात बस थांबवून मारहाण केल्यामुळे प्रवाशांमध्ये देखील संताप झाल्याचं दिसून आलं आहे.