⁠ 
शनिवार, मे 4, 2024

घरगुती गॅस सिलिंडर महागला ; जाणून घ्या जळगावमधील नव्या किंमती

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । आधीच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आज पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती आणि वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. आज घरगुती वापराचा सिलिंडर २५ रुपयांनी महागला आहे. तर वाणिज्य वापराचा सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे.

शासकीय तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. यानंतर, ते किंमतीत वाढ करण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतात. दरम्यान,  जागतिक बाजारात इंधन दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला आहे.

जळगावमधील नव्या किंमती?

आधीच जळगावकरांना पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त झाली असता त्यात आता गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीचा सामना करावा लागेल. आजच्या दर वाढीनंतर जळगावमध्ये गॅस सिलिंडरचा दर ८४० रुपये इतका झाला आहे. त्यात २५ रुपयाची वाढ झाली आहे.

इतर मोठ्या शहरातील दर?

 

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ८३४.५ रुपये झाला आहे. तर दिल्लीत ८३४ रुपये, कोलकात्यात ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५० रुपये झाला आहे. जून महिन्यात मुंबईत घरगुती सिलिंडरचा दर ८२५ रुपये होता. 

आज कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव आता १५०७ रुपये झाला आहे. जून मध्ये तो १४७०.५० रुपये होता तर मे महिन्यात तो १५९५.५० रुपये होता. कंपन्यांनी मे आणि जून महिन्यात या सिलिंडरचा भाव कमी केला होता.