⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मोकाट व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; निमखेडी शिवारातील रहिवाश्यांचे पालिकेला निवेदन

मोकाट व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; निमखेडी शिवारातील रहिवाश्यांचे पालिकेला निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी वाटीकाश्रम निमखेडी शिवारातील रहिवाश्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देवून केली आहे. भटक्या कुत्र्यांवर महापालिकेकडून कोणतेही उपाययोजना होत नसल्याने त्वरीत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

काय म्हटले आहे निवेदनात?

जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील गट नंबर १०८ व १०९ मधील वाटीकाश्रम परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून १० ते १५ मोकाट व भटक्या कुत्र्यांचा जमाव होवून येणार्‍या जाणार्‍यांना त्रास होत आहे. या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वरिष्ठ नागरिक तसेच महिला घराबाहेर निघू शकत नाही तसचे या कुत्र्यांमुळे लहान मुले कमालीचे धस्तावले आहेत. याशिवाय या कुत्र्यांमुळे परिसरामध्ये सर्वत्र घाणच घाण होते.

या घाणीमुळे दुर्गंधी येते व आजाराला निमंत्रण दिले जाते. तरी महानगरपालिकेच्या विभागाने अशा मोकाट व भटक्या कुत्र्यांवर त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर साहेबराव माळी, दीपक गुंजाळ, दिगंबर पाटील, भारती मराठे, मीना देवरे, हेमलता चौधरी, राणी मेटकर, स्मिता कोष्टी, संध्या मिसे, संगीता पाटील, नीता पाटील, वैष्णवी मेटकर, शोभाबाई भोई, चंद्रकांत वाघ, सपना सोनवणे, ज्योती भोई, त्रिवेणी खैरनार, मनीषा पाटील, सुजाता महाजन यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. डॉलरच्या मजबुतीदरम्यान न्यूयॉर्कमधील सध्याच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये लोकांनी जोरदार विक्री केली. यासह सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.