जाजळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । जामनेर येथे सहकारी महिला वैद्यकीय अधिकार्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी जितेंद्र वानखेडे यास न्यायाधीश डी.एन.चामले यांनी एक सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पहूर येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी आपल्या सहकारी महिला डॉक्टरांची छेड काढली होती. डॉ.जितेंद्र वानखेडे याने 2 जून 2021 रोजी पहूर ग्रामीण रुग्णालयात पत्नीचा वाढदिवस असल्याचे सांगून रात्री 12.30 वाजता सहकारी महिला डॉक्टरांना तुमच्यासाठी नॉनव्हेज आणले असल्याचे सांगून आग्रह धरला मात्र आरोपी डॉक्टर नशेत असल्याने पीडीतेने पार्सन घेवून दार बंद केले मात्र रात्री एक वाजता पीडीतेला फोन करून पुन्हा व्हॉटसअॅपर येण्यास सांगितले व मद्य प्राशन करण्यासाठी आग्रह धरला. घाबरलेल्या संबंधित महिला डॉक्टरने अन्य सहकार्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून पहूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायाधीश डी.एन.चामले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात डॉ. वानखेडे यांनी सहकारी वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. कृतिका भट यांनी बाजू मांडली.