जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । एरंडोल येथील म्हसावद नाक्यावर एकाने माझ्याकडे रागाने काय बघतोस असा जाब विचारला असता. त्यास शिवीगाळ करून डोक्यात सोड्याची बाटली मारल्याची घटना घडली आहे. यात एक इसम जखमी झाला आहे. याबाबत एरंडोल पोलिसांत गुन्हा दखल झाला आहे.
भवानी नगर येथील सुकदेव धमसिंग मोरे (वय ३८) हे दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास म्हसावद नाक्यावर भाजीपाला घेत असताना आरोपी बाल्या विठ्ठल मोरे रा. केवडी पुरा यास माझ्याकडे रागाने काय बघतो असे विचारले असता बाल्या मोरे याने सुकदेव धमसिंग मोरे शिवीगाळ करुन डोक्यावर सोडा बाटली मारुन जखमी केले. यावेळी स्वतः सुकदेव व त्याचे नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार केले. त्यांनतर एरंडोल पो.स्टे.ला जाऊन फिर्याद दिली. या बाबत एरंडोल पो.स्टे. पूढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ.संतोष चौधरी करीत आहे.