---Advertisement---
आरोग्य विशेष

डॉक्टर्स डे का साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे का ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । रखते हमारा ख्याल, और करते है बीमारियों का उपचार, ये डॉक्टर ही होते है धरती पर, ईश्वर का अवतार…. छोट्याश्या छोट्या सर्दीपासून तर मोठ्यात मोठे ऑपरेशनवर इलाज डॉक्टर करता असतात. शरीरातील असहाय्य वेदनेवर उपचार करून मानवी शरीर तंदुरुस्त करण्यात डॉक्टरांचा मोठा हात असतो. म्हणून त्यांना देवदूत पण समजलं जात. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आज आपण या विषयावर का बोलतोय ? तर आज आहे १ जुलै या दिवशी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (Indian Medical Association) दरवर्षी 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो. जाणून घेऊ राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाची संपूर्ण माहिती

doctor day jpg webp

1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करण्या मागचा इतिहास

---Advertisement---

बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी मानवतेच्या सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनी 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने म्हणजेच 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगायोगाने त्यांचेही 1 जुलै (1962) रोजी निधन झाले. या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली म्हणून काही लोक राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा करतात. डॉ बी सी रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 रोजी भारतरत्नही देण्यात आला होता.

डॉक्टर दिनाचे महत्व

कोविड-19 नंतर डॉक्टरांचे महत्त्व शब्दात मांडता येणार नाही. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जगातील डॉक्टरांनी ज्या भावनेने आणि समर्पणाने रुग्णांची सेवा केली, त्या बद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच

माणसाच्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका काय आहे हे आपण सारेच जाणतो. आपल्या संस्कृतीत डॉक्टरांना देव मानले जाते. डॉक्टरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. हा विशेष दिवस इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे साजरा केला जातो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---