जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । नोव्हेंबर महिन्यात जर बँकेची कामे करायची असतील तर ती कामे आताच करून घ्या, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रत्येक महिन्याप्रमाणे नोव्हेंबर २०२२ च्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण १० दिवस बँका बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. त्यानुसार ॉ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्यांमधील विशिष्ट सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.
नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या
१ नोव्हेंबर २०२२ – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
6 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 नोव्हेंबर 2022 – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव बँका आगरतळा, बंगळुरू, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुट्ट्या बंद.
11 नोव्हेंबर 2022 – कनकदास जयंती/ वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद
12 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
13 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
20 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 नोव्हेंबर 2022 – सेंग कुत्सानेम- शिलाँगमध्ये बँका बंद
26 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
27 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)