---Advertisement---
महाराष्ट्र जळगाव जिल्हा जळगाव शहर राजकारण

भाजप संपविण्याची सुपारी घेतलेल्यांसोबत बाजार समितीत युती नकोच…!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । ज्यांनी जळगाव तालुक्यातून भाजप संपविण्याची सुपारी घेतली आहे. अशांसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये युती करण्यात येवू नये असा संतप्त सुर शुक्रवारी भाजप कार्यालयात जळगाव तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जेवढे यश मिळेल तेवढे यश स्वबळावरच मिळवा, शिवसेना शिंदे गटासोबत युती न करताच बाजार समितीची निवडणूक लढविण्याची भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. बाजार समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने, सर्व कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक कोणासोबतही न लढता , स्वबळावरच लढण्याचा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी केला.(dont allay with shinde – bjp )

gulabaro patil and bjp jpg webp webp

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी भाजप कार्यालयात तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे उपजिल्हाप्रमुख पी.सी.पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लाालचंद पाटील, तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, चंद्रशेखर अत्तरदे, राजू सोनवणे, कैलास चव्हाण, हभप ज्ञानेश्वर जळकेकर, मिलींद चौधरी, ॲड.हर्षल चौधरी, भाऊसाहेब पाटील, गिरीश वराडे, सुधीर सुर्वे, संजय भोळे यांच्यासह इतर पदाधिकारी व विविध गावांचे ग्रा.पं. व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य उपस्थित होते. (bjp bajar samiti eletion 2023 )

---Advertisement---

राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून देखील जळगाव तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे गऱ्हाणे या बैठकीत मांडण्यात आले. सहा महिन्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसह इतर पदाधिकाऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. तसेच शिवसेना शिंदेगटाच्या नेत्यांनी तालुक्यातून भाजप संपविण्याची सुपारी घेतल्याचा दावा केल्यावर देखील शिवसेना शिंदे गटासोबत युती करून निवडणूक लढविल्यास पक्षाचा व भाजपच्या कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे तीव्र मत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही इच्छुकांची मनं जाणून घेतली. भाजपकडून ४० जण बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती तालुकाप्रमुख गोपाळ भंगाळे यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांची भावना बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्याची आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाप्रमुख सुरेश भोळे यांना दिली जाणार असून, याबाबत अंतीम निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील अशीही माहिती भंगाळे यांनी दिली.

जळगाव बाजार समितीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आधीच स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटानेही युती न करताच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भाजपने देखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे जळगाव बाजार समितीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---